मुंबई

आजकाल कुठेही जाताना प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. लोक फारसा विचार न करता बाजारातून प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी विकत घेऊन ते पितात. मात्र हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. प्लास्टिक पर्यावरण आणि आरोग्याला हानी पोहोचवते. अशा स्थितीत तुम्ही ज्या बाटलीतून पाणी पिता ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. प्लास्टिकमध्ये धोकादायक केमिकल आणि बॅक्टेरिया असतात. अशा बाटल्यांचा वापर करताना हे घटक शरीरात प्रवेश करतात आणि गंभीर आजार उद्भवू शकतात. जाणून घेऊया प्लास्टिकच्या पाणी बाटलीच्या वापराचे दुष्परिणाम…

प्लास्टिकच्या बाटल्या हानिकारक का आहेत?
प्लास्टिक हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोराईडपासून बनते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापैकी बीपीए हे प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या बनवण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वात हानिकारक रसायन आहे. जेव्हा पाणी जास्त काळ उच्च तापमानात ठेवले जाते तेव्हा त्याची पातळी अनेक पटींनी वाढते, ज्यामुळे आरोग्यास गंभीर हानी होऊ शकते.

हृदयाचे आजार आणि मधुमेहाची जोखीम
हार्वर्ड स्कूल आणि पब्लिक हेल्थच्या अभ्यासानुसार पॉली कार्बोनेटच्या बाटलीत पाणी पिणारांच्या युरीनमध्ये पॉली कार्बोनेट प्लास्टिक तयार करण्यासाठी वापरल्या जाणारं केमिकल बिस्फेनॉल आढळलं आहे. जर याचं प्रमाण वाढलं तर हृदयासंबंधित आजार आणि मधुमेहाचा धोका अनेक पटीने वाढतो.

वंध्यत्व, यकृताच्या आजारांचा धोका
प्लास्टिकच्या बाटलीचा वापर केल्याबाबत तज्ज्ञांनी सांगितलं की, प्लास्टिकच्या पाण्याची बाटली जेव्हा गरम होते तेव्हा पाण्यात मायक्रो प्लास्टिक हळूहळू सुटू लागतं. या सुक्ष्म प्लास्टिक कणांमुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे हार्मोनल असंतुलन, वंधत्व आणि यकृताशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here