मुंबई

वेलकम ३ च्या शूटिंगवरुन परतल्यानंतर गुरुवारी अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर येताच चाहत्यांना धक्काच बसला. त्याची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे.

रात्री शूटिंगहून घरी परतल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. यानंतर पत्नीने त्याला रुग्णालयात दाखल केलं. तो दिवसभर शूटिंगमध्ये होता, तेव्हा त्याची प्रकृती ठीक होती. त्याने एक अॅक्शन सीनही शूट केला. घरी परतल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. पत्नी त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच तो खाली कोसळला.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर श्रेयस तळपदेची अँजिओप्लास्टी झाली. डॉक्टरांनीही त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली. आता श्रेयसची प्रकृती ठीक असून अद्याप त्याला आयसीयूच्या बाहेर आणण्यात आलेले नाही.

श्रेयस तळपदे याचे चित्रपट
श्रेयसने नागेश कुकुनूर याच्या इक्बाल (२००५) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याचा पहिलाच चित्रपट यशस्वी राहिला. यानंतर त्याने अपना सपना मनी मनी, ओम शांती ओम, गोलमाल रिटन्स, गोलमाल ३, हाऊसफूल २ आणि गोलमाल अगेन सारख्या मोठ्या चित्रपटातून भूमिका साकारल्या. श्रेयसचं वय सध्या ४७ वर्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here