@maharashtracity

राज्यात २४,९४८ नवीन रुग्ण

मुंबई: राज्यात शुक्रवारी १०३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६% एवढा असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

शुक्रवारी झालेल्या 103 मृत्यू संख्येवर बोलताना कोविड मृत्यू निरीक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले कि, यापूर्वीच कोविड मृत्यू वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. डॉ. सुपे यांच्या मते सध्या सहव्याधी तसेच ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. अजूनही ५०० जण व्हेंटिलेटरवर तर १५०० रूग्ण आयसीयूत असल्याचे डॉ. सुपे म्हणाले.

दरम्यान, शुक्रवारी २४,९४८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७६,५५,५५४ झाली आहे. काल ४५,६४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७२,४२,६४९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६१% एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण २,६६,५८६ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,४१,६३,८५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७६,५५,५५४ (१०.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात १४,६१,३७० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,२०० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत १३१२ बाधित

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १३१२ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०४२१४१ रुग्ण आढळले. तसेच १० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एण मृत्यूची संख्या १६५९१ एवढी झाली आहे.

फक्त पुण्यात ओमिक्रोन नोंद
आज राज्यात ११० ओमिक्रोन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले असून हे सर्व पुणे मनपा क्षेत्रात रिपोर्ट केले आहेत. त्यामुळे आजपर्यंत राज्यात एकूण ३०४० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले असल्याचे सांगण्यात आले. यापैकी १६०३ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

तर आजपर्यंत एकूण ६६०५ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६४१८ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १८७ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here