@maharashtracity

आंदोलनाचा दिला इशारा

वरळीतील मैदानाला गांधींजींच्या नावाचा फलक नसल्याचा भाजपचा आक्षेप

शिवसेनेची सावध भूमिका

मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना शिवसेना – भाजपात मालाड येथील टिपू सुल्तान नामकरणावरून वाद रंगलेला असताना आता वरळी येथील जांभोरी मैदानाला महात्मा गांधींच्या नावाचा नामफलक नसल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे.

तसेच, महात्मा गांधी यांच्या नावाचा नामफलक त्वरित न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजपतर्फे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला आहे.

वरळी येथील जांभोरी मैदानाचा विकासाचे काम शिवसेनेने हाती घेतले आहे. या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

मात्र वरळीतील या जांभोरी मैदानाला महात्मा गांधीजींच्या नावाचा फलकच नसल्याने भाजप आक्रमक झाले आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मैदानाचे लोकार्पण झाल्यावरही महात्म्याचा नावाचा विसर पडावा हे दुर्देवी आहे, अशी टीका करीत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी शुक्रवारी स्थायी समितीत याबाबतचा मुद्दा उपस्थित केला.

याबाबतची माहिती घेऊन नामकरणाचा फलक लावण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here