हिवाळ्याच्या दिवसात रस्त्यावर भाजलेले रताळे विकताना आपण पाहिलं असेल. मात्र रस्त्यावर अत्यंत स्वस्त विकला जाणारा हा पदार्थ तुम्हाला अनेक घातक आजारांपासून वाचवू शकते.

रताळ्यात कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म आढळतात. अँटिऑक्सिडंट काही प्रकारच्या कर्करोगाच्या पेशींचे संरक्षण आणि नाश करण्याचे काम करतात. मूत्राशय, कोलन, पोट आणि स्तनाचा कर्करोग झाल्यास रताळी खाणं केव्हाही चांगलं.

जर तुम्ही रात्रंदिवस वाढलेल्या पोटाची चिंता करत असाल आणि ते कमी करण्यासाठी रताळी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये फायबर आणि आर्द्रता असते ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि सततच खाणं रोखलं जातं.

ही भाजी आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात फायबर भरपूर असते जे आतड्यांमधून मल बाहेर टाकण्यास मदत करते. बद्धकोष्ठता असल्यास ते खाल्ल्याने पोट सहज साफ होऊ शकते.

रताळ्यामुळे दृष्टीतही चांगला परिणाम होतो. अवघ्या २०० ग्रॅम रताळ्यामुळे डोळ्यांना आवश्यकतेपेक्षा दुप्पट पोषण मिळतं.

(वरील लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. याचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here