हिंगोली

राज्यात मराठा आरक्षणावरुन संघर्ष सुरू असताना हिंगोलीच्या खंडाळा येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंगोलीमध्ये दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा झाली होती.

नेहमीप्रमाणे येथेही जरांगे पाटील यांनी मराठा तरुणाला आत्महत्येसारखं पाऊल उचलू नका असं आवाहन केलं होतं. याला दोन दिवस उलटताच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीच्या २६ वर्षीय विठ्ठल दत्तराव गायकवाड या तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही बाब गावात पसरताच खळबळ उडाली. विठ्ठल हा मराठा समाजाच्या लढ्यात सक्रीय असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. जरांगे पाटलांच्या सभेतही तो सहभागी झाला होता आणि स्वयंसेवकाची जबाबदारी पार पाडली होती. पदवीपर्यतचे शिक्षण घेऊनही नोकरी नसल्याने आणि आरक्षणाचा तिढा सुटला नसल्यानं परिणामी नैराशजन्य जीवन जगावं लागत असल्याने त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं, असं सांगितलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here