बुधवारी ब्राझीलमध्ये एक अशी घटना घडली, ज्यामुळे लोक हैराण झाले. ब्राझीलमध्ये गॉस्पल सिंगर पेड्रो हेनरिकचा सादरीकरणादरम्यान मृत्यू झाला. 30 वर्षांचा पेड्रो बुधवारी ब्राझीलच्या एका धार्मिक कार्यक्रमात गाण गात होता. गाणं गात असताना तो आपलं सादरीकरण एन्जॉय करीत होता. अचानक तो जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध झाला. ही सर्व घटना व्हिडीओमध्ये कैद झाली आहे.

सादरीकरणादरम्यान गायकाचा अचानक मृत्यू
व्हिडीओमध्ये पाहून शकता की, गायक स्टेजच्या किनाऱ्यावर उभा राहून गाणं गात आहे. पेड्रो Vai Ser Tao Lindo नावाचं गाणं गात होता. गायकाने पांढऱ्या रंगाचा सूट घातला आहे. एका लांबलचक नोट घेतल्यानंतर तो थोडावेळ थांबतो आणि त्याचं संतुलन बिघडतं आणि तो स्टेजवर कोसळला, बेशुद्ध पडला. पेड्रो हेनरिकच्या जवळ उभा असलेला गिटारिस्ट त्यांना पाहतच राहिला.

पेड्रोच्या मृत्यूचं कारण काय?
स्टेजवर कोसळल्यानंतर पेड्रो हेनरिकला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेजवर सादरीकरण करण्यापूर्वी त्याने आपल्या मित्राला सांगितलं होतं की तो खूप थकला आहे. हेनरिकला हृदयविकाराचा झटका आला आणि तो इतका भयंकर होता की त्याचा काही वेळात मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here