मुंबई

हिवाळ्यात थंडी असल्याने अनेक जणं पाणी पिण्याचं प्रमाण कमी करतात. कारण थंडीत तहान कमी लागते. मात्र उन्हाळ्याप्रमाणे थंडीतही शरीराला पाण्याची तितकीच आवश्यकता असते. पाणी कमी प्यायल्याने शरीराला नुकसान होऊ शकतं.

जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, तेव्हा पेशी मेंदूला सिग्नल पाठवतात, ज्यामुळे किडनीला रक्तातील पाणी कमी काढण्याचा संदेश मिळतो. त्यामुळे लघवी कमी आणि गडद रंगाची होते. मूत्रपिंडांना रक्त फिल्टर करण्यासाठी पुरेसे द्रव आवश्यक असते. अशा परिस्थितीत पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील विषारी घटक वाढतात, ज्यामुळे सर्व अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन देखील बिघडू शकते.

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे…
संक्रमणाचा प्रमुख कारण जीवाणू किंवा व्हायरस असतात. मात्र कमी पाणी प्यायल्यास आजारांशी लढण्याची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो,

हिवाळ्यात कशा प्रकारचं पाणी प्यायला हवं
थंड पाणी –

हिवाळ्यात थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्थेला हानी पोहोचते. थंड पाण्यामुळे पचनक्रिया मंदावते, त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. यामुळे अपचन, गॅस, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात. थंड पाण्यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे यांसारख्या समस्याही होऊ शकतात.

कोमट पाणी –
कोमट पाणी पचनासाठी फायदेशीर आहे. कोमट पाण्यामुळे पचनसंस्था मजबूत होते. ज्यामुळे जेवणाचं पचनही योग्य पद्धतीने होतं. कोमट पाणी बद्धकोष्ठताही दूर करते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर ताजंतवानं वाटतं.

गरम पाणी –
गरम पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत करतं. मात्र जास्त गरम पाणी प्यायल्यात बद्धकोष्ठता होऊ शकते. त्यामुळे गरम पाणी जास्त प्रमाणात पिऊ नये. ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे आणि कफाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी गरम पाणी फायदेशीर. याशिवाय ज्यांना नाक, गळा, फुप्फुसांशी संबंधित त्रास आहेत, जे लठ्ठ आहेत किंवा सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनीही गरम पाणी प्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here