मुंबई

मुली आपली त्वचा उजळवण्यासाठी अनेक व्यावसायिक उत्पादने वापरतात, पण तरीही त्वचा तशीच दिसते. पण तुम्हाला माहित आहे का की व्हिटॅमिन ई तुमच्या त्वचेसाठी अमृताचं काम करते. ते त्वचेवरील डाग आणि ठिपके काढून टाकते आणि त्वचा गोरी आणि घट्ट बनवते.

व्हिटॅमिन ई त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. ती त्वचा उजळ करते, सुरकुत्या आणि डाग कमी करण्यास मदत करते आणि त्वचा गुळगुळीत आणि निरोगी बनवते. व्हिटॅमिन ई तेल एन्टी एजिंगचं काम करते.

काही दिवस याचा वापर केल्यानंतर त्वचेतील फरक तुम्हाला जाणवतो. व्हिटॅमिन ई कॅप्सूल सहजपणे मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होते. व्हिटॅमिन ई चेहऱ्यावर कसं अप्लाय कराल याबाबत डॉ. विनोद शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याचा परिणामा दुप्पट वाढेल. आधी जाणून घेऊया व्हिटॅमिन ई चेहऱ्यावर लावण्याचे फायदे…

कसा वाढेल ग्लो?

  • सर्वात आधी चेहऱ्यावरील मेकअप काढून घ्या आणि चेहरा फेसवॉशने स्वच्छ करा
  • चेहरा कोरडा करून घ्या
  • आता व्हिटॅमिन ई ऑईल घ्या, त्यात दोन थेंब नारळाचं तेल घालून एकत्र करा.
  • हे मिश्रण हातावर थोडा वेळ एकत्र करून घ्या आणि चेहऱ्यावर लावा.
  • चेहऱ्यावर चांगला मसाज करा
  • तब्बल २० मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
  • हे तेल सकाळी न लावता रात्री लावणं केव्हाही चांगलं. हे तेल घट्ट असते. रात्री लावल्याचा चांगला फायदा मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here