अयोध्या

अयोध्येत बांधले जाणारे राम मंदिर हे जगभरातील कोट्यवधी सनातन धर्म भक्तांसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. सुमारे 500 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता राम मंदिर भव्य (Ayodhya Ram Mandir) स्वरूप धारण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या मंदिराचं उद्घाटन 24 नोव्हेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याआधी, 22 जानेवारी 2024 रोजी मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल.

अनेक फेऱ्यांनंतर या भव्य मंदिरात पूजा करण्यासाठी 20 पुजारी नेमले जात आहेत. यात निवड झालेल्यांमध्ये लखनऊच्या मोहित पांडेंचाही समावेश आहे.

देशभरातून आले ३ हजार अर्ज
मोहित पांडे सध्या तिरुपती मंदिराकडून संचिलाय श्री वेंकटेश्वर वैदिक विश्वविद्यालयातून एमएचा कोर्स करीत आहेत. मूळचे लखनऊचे असलेले मोहिम पांडेंना अयोध्येतील श्री राम मंदिरात पुजारी बनण्यासाठी कठोर निवड प्रक्रियेतून जावे लागले. अयोध्या मंदिरात पुजारी बनण्यासाठी देशभरातून 3 हजार अर्ज आले होते. ज्यापैकी शिक्षण आणि अनुभवाच्या आधारावर 200 जणांची निवड करण्यात आली. यानंतर यांची मुलाखत प्रक्रिया झाली आणि यातून 50 टॉप उमेदवारांची निवड करण्यात आली.

सहा महिन्यांची ट्रेनिंग
उमेदवारांची निवड करण्याची जबाबदारी वृंदावनचे संत जयकांत मिश्रा आणि अयोध्याचे दोन महंत, सत्यनारायण दास आणि नंदिनी शरण यांच्यावर सोपवण्यात आली होती. आता निवड झालेले उमेदवार आपली 6 महिन्यांची अनिवार्य ट्रेनिंग पूर्ण करीत आहेत. यादरम्यान त्यांच्यातील क्षमता वाढवणे आणि स्वत:ची जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार केलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here