मुंबई
पैसा कमावण्यासाठी आणि आल्हाददायक जीवन जगण्यासाठी मेहनत करावी लागते. अनेकदा मेहनत आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशात काहीजणं काम बदलतात किंवा नव्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याचा विचार करतात. नवं काम सुरू करतानाही यश मिळेल की नाही, याबाब अनेक प्रश्न घोंगावत असतात.
काहींना लगेच यश मिळतं तर काहींना प्रतीक्षा करावी लागते. तुम्हालाही नव्या कामात यश मिळत नसेल तर यामागे वास्तू शास्त्र कारण ठरू शकतं. आज अशाच काही नियमांबद्दल माहिती घेणार आहोत.
जर तुम्ही मालक आहात…
जर नव्या प्रोजेक्टचे तुम्ही मालक असाल तर तुमच्या बसण्याची व्यवस्था कशी आहे, हे महत्त्वाचं ठरतं. तुम्ही बॉस असाल तर तुम्हाला दक्षिण-पश्चिम दिशेने बसून काम करायला हवं. यामुळे कामात स्थैर्य आणि यशही मिळतं.
वॉटर फाऊंटन वा फिश एक्वेरियम
काम करत असलेल्या ठिकाणी वॉटर फाऊंटेन किंवा फिश एक्वेरियम नक्की लावा. हे उत्तर-पूर्वेकडे लावू शकता. जर तुम्ही फिश एक्वेरियम ठेवत असाल तर त्यात एक काळा रंगाचा मासा नक्की ठेवा, यामुळे कामात उत्कर्ष होईल.
स्टिकी नोट
तुम्हाला माहिती असेल की काही लोक महत्त्वाच्या गोष्टी स्टिकी नोटवर लिहून भिंतीवर किंवा आपल्या कम्प्युटरवर चिकटवतात. वास्तू शास्त्रानुसार, हे टाळायला हवं, यामुळे कामात नकारात्मकता येते.
चेहऱ्याची दिशा
एखादे नवीन काम सुरू करताना किंवा नवीन प्रकल्पात गुंतवणूक करताना तुमचा चेहरा कोणत्या दिशेला असावा हे खूप महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा की तुमचा चेहरा उत्तर दिशेला असावा. असे केल्याने कामात भरभराट होते आणि प्रगती होते. उत्तर दिशेला पैशाचे व्यवहारही शुभ मानले जातात कारण ही दिशा कुबेराची दिशा मानली जाते.
खुर्ची-टेबल
लक्षात घ्या की तुमचं ऑफिस किंवा काम करण्याच्या जागेवरील खुर्ची-टेबल एकदम स्वच्छ असायला हवी. अनेकदा खुर्ची-टेबलावर चहा-कॉफीचे डाग राहून जातात. मात्र हे तातडीने स्वच्छ करू घ्यावे. अस्वच्छ खुर्ची टेबलांमुळे नकारात्मकता पसरते.
(वरील दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. महाराष्ट्र सिटी याची पुष्टी करीत नाही. )