जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांचे स्पष्टीकरण

@maharashtracity

महाड (रायगड): महाड (Mahad) तालुक्यातील कांबळे तर्फे बिरवाडी गावाजवळ दगड खाणी मध्ये पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमाल निकामी करत असताना झालेल्या अपघातानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दूधे (SP Ashok Dudhe) यांनी भेट देऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच मुद्देमाल नष्ट केला जात असल्याचे स्पष्टीकरण दिले.

माणगाव येथे सन 2013 मध्ये जिलेटिन डेटोनेटर (Gelatin detonator) अशा प्रकारचे स्फोटक जप्त करण्यात आली होती. या जप्त केलेल्या मुद्देमालाची कांबळे तर्फे बिरवाडी येथे दगड खाणी मध्ये निकामी करण्याचे काम सुरू असताना झालेल्या स्फोटात तीन पोलीस जवान जखमी (Police injured in the blast) झाले. या घटनेने महाड तालुका हादरुन गेला असून ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या परिसरातील गावांना देखील हादरे बसले.

गावातील घरांना तडे गेले असून या नुकसानीचा पंचनामे महसूल विभागामार्फत करण्यात येत आहेत. घटनेची पाहणी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी भेट दिली असता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच मुद्देमाल नष्ट करण्याची प्रक्रिया केले गेले असल्याचे स्पष्टीकरण दिले.

हा अपघात कसा झाला याबाबत समिती स्थापन करून चौकशी केली जाईल, असे देखील सांगितले. गंभीर जखमी झालेल्या दोन पोलीस जवानांची तब्येत स्थिर असल्याचे सांगून जखमींवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here