@maharashtracity

वैद्यकीय शिक्षण विभागाचा अजब कारभार

मुंबई: राज्यातील सर्व १९ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी प्राध्यापक सेवा समावेशनाच्या मागणीसाठी जे जे रुग्णालयात साखळी उपोषण करत आहेत. मात्र प्राध्यापकांचे हे आंदोलन सुरु असताना राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत कंत्राटी प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांना मानधन वाढ तसेच त्यांच्या कंत्राटी नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात आला. अशी कोणतीही मागणी नसताना कॅबिनेट निर्णय घेतल्याने अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली असून त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचा हा अजब कारभार असल्याचा आरोप करत या निर्णयाचा निषेध केला आहे.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना अध्यक्ष डॉ. सचिन मुळकुटकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री, सचिवांना अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांबद्दल आस्था राहिली नसल्याचा संपप्त सवाल उपस्थित केला. वैद्यकिय शिक्षण मंत्र्यांनी २००९ व २०१६ च्या धर्तीवर कोरोना काळात कामाची दखल म्हणुन सेवा नियमित करण्याचे आश्वासन दिले होते.

अस्थायी सहाय्यक प्राध्यापक हे उच्च शिक्षित असूनही सरकारच्या आडमुठेपणामुळे प्राध्यापकांवर साखळी उपोषण करण्याची दुर्देवी वेळ आली असल्याचे आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचा प्रश्न सरकार दरबारी मांडण्याची अपेक्षा वैद्यकीय शिक्षण विभागातून व्यक्त करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here