नवी दिल्ली
शेअर बाजारात आज विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे. सकाळपासून सेन्सेक्स आणि निफ्टी वेगाने धावत आहेत. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात बदल न केल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.
सकाळी बाजार उघडताच BSE सेन्सेक्स 900 अंकांनी वाढून 70,485 वर पोहोचला होता. सकाळी 10 च्या सुमारास निफ्टी50 251 अंकांनी वाढून 21,177 वर पोहोचला होता. दरम्यान, BSE वरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 3 लाख कोटी रुपयांनी वाढून 354.19 लाख कोटी रुपये झाले आहे. आज सकाळी सेन्सेक्सने नवा इतिहास रचला आहे.
सेन्सेक्स 561अंकानी वाढून उच्च पातळीवर 70,146 पर्यंत उघडला. तर दुसरीकडे निफ्टी 50 ने 21,110पातळीवर सुरुवात करीत 184 अंकाने उसळी घेतली. सेन्सेक्स 700 अंकानी वाढून 71,0381 च्या नव्या पातळीपर्यंत पोहोचला. अमेरिकेच्या शेअर बाजारातील तेजीनंतर आज देशांतर्गत शेअर बाजारातही बंपर तेजी पाहायला मिळू शकते.
या कारणांमुळे बाजार तेजीत
शेअर बाजारातील ही तेजी अशीच आलेली नाही. तर या तेजीमागे अमेरिकी फेडलर रिझर्व्ह बँकेच्या सलग तिसऱ्यांना प्रमुख व्याजदरात वाढ झाले नसल्याचं कारण आहे. व्याज दरात बदल करण्यात आलेला नाही. अमेरिका फेडरल रिझर्व्ह बँकेचा व्याज दर निश्चित करणारी फेडरल ओपन मार्केट समितीच्या या निर्णयामुळे जगभरातील बाजारांना दिलासा मिळाला आहे.