मुंबई

हिंदू धर्मात तुळस खूप महत्त्वाची मानली जाते. तुळस घरात लावल्यामुळे नकारात्मकता घरापासून दूर जाते आणि दुष्ट प्रवृत्ती घरापासून लांब राहतात. भगवान विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे, आणि यात देवी लक्ष्मीचा वास असतो. वास्तू शास्त्रानुसार तुळशीशी संबंधित काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

  • तुळस अत्यंत शुभ मानली जाते. तुळस घरात ठेवल्यामुळे सर्व प्रकारची संकटं आणि नकारात्मकता लांब ठेवता येते. जेथे कचरा असेल अशा ठिकाणी तुळस कधीही ठेवू नये.
  • तुळस नेहमी हिरवीगार राहावी याकडे लक्ष ठेवा. तुळस कधीही अंधारात किंवा एका कोपऱ्यात ठेवू नये.
  • तुळस गणपतीच्या फोटोसमोर ठेवू नये, कारण तुळस आणि गणेशाने एकमेकांना श्राप दिला होता.
  • तुळस ठेवल्यामुळे घर धन-धान्याने भरून जातं. तुळशीजवळ शंकराचा फोटो किंवा मूर्ती ठेवू नये.
  • तुळस घराच्या गच्चीवर ठेवू नये, यामुळे घरात दारिद्रय येऊ शकतं आणि सुख-समृद्धीचा नाश होऊ शकतो.

(वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. महाराष्ट्र सिटी याची पुष्टी करीत नाही)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here