मुंबई

हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत (Makar Sankranti 2024) हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो. मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी होत असली तरी 2024 मध्ये मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 रोजी साजरी केली जाणार आहे.

ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रहांचा राजा सूर्य 14 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 02:42 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. 15 जानेवारीला उदया तिथी येत आहे. अशा परिस्थितीत 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांत साजरी होणार आहे. अशा परिस्थितीत सूर्यास्तानंतर राशीत बदल झाल्यामुळे या वर्षी मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त १५ जानेवारीला असणार आहे. या वर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येईल म्हणजेच त्याचे वाहन घोडा आणि उपवाहन सिंह असेल. मकर संक्रांतीच्या आगमनाने खरमासाचा एक महिनाही संपणार आहे.

संक्रातीला सुर्याची पूजा, नदीत स्नान, देव दर्शन आणि दान केल्यामुळे पुण्य मिळेल. यंदाचं वाहन घोडा आणि उपवाहन सिंह असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढेल. दुसऱ्या देशांशी संबंध मजबूत होतील. विद्वान आणि शिक्षितांसाठी ही संक्रांत शुभ राहील. मात्र काहींसाठी भीती वाढू शकते. धान्य वाढेल आणि महागाईवरही नियंत्रण राहील.

(वर दिलेली माहिती सामान्य मान्यतांवर आधारित आहे. महाराष्ट्र सिटी याची पुष्टी करीत नाही)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here