मुंबई

काहींना लहान-मोठं काम केलं तरी थकवा जाणवतो. शरीरातील थकवा आणि अशक्तपणा येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स सारख्या पोषण घटकांच्या अभावाने शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. अनेकांना अशा प्रकारचा त्रास नियमितपणे होतो. मुख्यत: यामागे चुकीचा आहार मानला जातो. तुम्हालाही शारीरिक थकवा आणि अशक्तपणा सारखा त्रास होत असेल तर तुम्ही काही चांगले अन्नपदार्थ खाण्याची आवश्यकता आहे.

चिया सीड्स – हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, चिया सीड्स शक्ती देणारा पदार्थ आहे. चिया सीड्समधून मोठ्या प्रमाणात एनर्जी मिळते. थोडं काम केल्यानंतरही थकवा जाणवत असेल तर तुम्ही काही दिवसांसाठी चिया सीड्सचा खाण्यात समावेश करणं फायद्याचं ठरेल. चिया सीड्समध्ये हेल्दी फॅटसह डायट्री फायबर, प्रोटीन, कार्बोहायड्रेट सारख्या घटकांचा समावेश असतो.

प्रोटीनयुक्त पदार्थ – सतत थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता असल्याची शक्यता आहे. यासाठी आहारात मसूरची डाळ, दूध, अंड, चिकन ब्रेस्ट, ओट्स, राजमा, भिजवलेले बदाम, मासे, हिरव्या भाज्या, पेरू, हिरवे मटार, आदीचा समावेश करावा.

ड्राय फूट्स आणि सीड्स – शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर ड्राय फ्रूट्स आणि सीड्सची पावडर करून त्याचा काही दिवस आहारात समावेश करा. तातडीने परिणाम दिसून येईल. तुम्ही नाश्त्यात काजू, अक्रोड, बदाम आदी सेवन करू शकता.

केळं – केळ्यात तातडीने एनर्जी देणारे घटक असतात. यासाठी खेळाडून खेळादरम्यान केळं खाताना आपण पाहतो. केळ्यात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, पोटॅशियम, फायबर, विटॅमिन सारख्या तत्वांचा समावेश असतो, ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here