@maharashtracity

परिक्षेची तयारी पूर्ण झाल्याची आरोग्य विभागाकडून माहिती

मुंबई: आरोग्य विभागाच्या गट ड संवर्गातील रिक्त पदाच्या भरतीसाठी येत्या रविवारी, ३१ ऑक्टोबर २०२१ परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या लेखी परिक्षेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी शुक्रवारी दिली.

परीक्षेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले असल्याचेही पाटील म्हणाल्या.

दरम्यान, गट ड संवर्गातील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यालयातील ४२ संवर्गातील ७८ कार्यालयातील ३४६२ पदे भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

Also Read: राज्यात कोरोनाचे १३३८ नवीन रुग्ण

याकरिता ४,६१,४९७ उमेदवारांचे अर्ज प्राप्तअसून १३६४ केंद्रांवर परीक्षा आयोजन करण्यात आले आहे. तर कालपर्यंत ३.६२ लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेतले आहे.

गट ड संवर्गातील परीक्षा एकाच सत्रात होणार असून उमेदवारांनी त्यांना दिलेल्या प्रवेश पत्रानुसार नियोजन करावे. काही शंका असल्यास ९५१३३१५५३५, ७२९२०१३५५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, गट क संवर्गातील पदांच्या भरतीसाठी झालेल्या परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध केली असून याबाबत काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी संकेतस्थळावर आवश्यक पुराव्यानिशी नोंदवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here