@maharashtracity

राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकाऱ्याचा ही दुजोरा

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट (corona wave) आटोक्यात येत असताना या लाटेतील महत्वाच्या टप्प्यांची माहिती आता समोर येत आहे. प्रत्येक लाटेत मृत्यू महत्वाचा मानला जात असून त्या त्या संख्येवर तेथील कोविड तीव्रता दिसून येते. दुसऱ्या लाटेत पुणे मंडळात सर्वाधिक मृत्यू झाले असून यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. तर तिसऱ्या क्रमांकावर नाशिक मंडळ असल्याचे सांगण्यात आले. (Highest deaths in Pune circle due to corona)

दरम्यान, राज्यात दुसऱ्या लाटेत ८९ हजार म्हणजे ६४ टक्के मृत्यू नोंदविण्यात आले. या ६४ टक्क्यात पुणे मंडळातील पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड, सोलापूर आणि सांगली या भागात सर्वाधिक मृत्यू म्हणजे २२ टक्के मृत्यू नोंदविण्यात आले.

या पाठोपाठ मुंबई मंडळ असून या ठिकाणी १७.८ टक्के मृत्यू नोंद करण्यात आली. तसेच नाशिक मंडळात १७ टक्के मृत्यू नोंदविण्यात आले आहे.

यावर बोलताना राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे
(Dr Pradeep Awate) यांनी सांगितले की, पुण्यात सतत धडकणारे परप्रांतीयांचे लोंढे, कमी क्षेत्रफळावर मोठी लोकसंख्या आणि प्रामुख्याने संसर्गजन्य आजारासाठी पोषक असलेले येथील वातावरण यामुळे पुण्यात कोविडने मृत्यू अधिक झाले.

तसेच २००९ सालात फ्लूची महामारी सुरु झाली. त्यावेळी सुद्धा पुणेच मुख्य केंद्र होते. येथील वातावरण संसर्गजन्य आजारांना पोषक असल्याचे समोर आले असल्याचे डॉ. आवटे म्हणाले.

दीर्घ कालीन आजारात मुंबई पेक्षा पुणे ,नाशिक, नागपूर शहर आता अव्वल होत आहेत. अशा आजारांना पोषक हवामान या शहरांत असल्याने येथे मृत्यू संख्या अधिक आहे.

  • डॉ. प्रदीप आवटे, राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here