@maharashtracity

राज्यात १८,०६७ नवीन रुग्ण

मुंबई: राज्यात बुधवारी १८,०६७ नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,५३,५४८ झाली आहे. आज ३६,२८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ७४,३३,६३३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८७% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,७३,२२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तसेच राज्यात बुधवारी ७९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४ % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,४९,५१,७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७,५३,५४८ (१०.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,७३,४१७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,६१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत ११२१ बाधित

मुंबई महानगरपालिका (Mumbai) क्षेत्रात ११२१ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०४७५९६ रुग्ण आढळले. तसेच १० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६६४० एवढी झाली आहे.

राज्यात ११३ ओमायक्रॉन रुग्ण

राज्यात बुधवारी ११३ ओमायक्रॉन (Omicron patients) संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले. यापैकी १०९ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान (NIV) संस्थेने आणि ४ रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय (BJ Medical College) यांनी रिपोर्ट केले आहेत. तर ११३ रुग्णात नागपूर- ४२, मुंबई आणि ठाणे मनपा- प्रत्येकी १८, नवी मुंबई-१३, पुणे मनपा – ६, अमरावती-४, सातारा-३, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग -२, औरंगाबाद, नाशिक, पिंपरी चिंचवड मनपा, रायगड आणि उल्हासनगर मनपा – प्रत्येकी १ असे सांगण्यात आले.

आजपर्यंत राज्यात एकूण ३३३४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले. यापैकी १७०१ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RTPCR test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ६८९८ नमुने जनुकीय तपासणीसाठी (Genome Sequencing) पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६७३९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १५९ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here