@maharashtracity

६ जण बचावले

मुंबई: समुद्रात पोहायला गेलेल्या ८ मुलांपैकी २ अल्पवयीन मुलांचा खोल पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला तर ६ जण बचावले आहेत. )(minor boys drown in Arabian sea near Malabar hill) ही घटना प्रियदर्शनी पार्क, मलबार हिल येथील समुद्राच्या ठिकाणी सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

रेहमान रिझवान शेख (१५) व मोहम्मद दिलशाद शेख (१२) अशी मृत मुलांची नावे आहेत. यासंदर्भातील माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, रेहमान रिझवान शेख (१५) व मोहम्मद दिलशाद शेख (१२) हे दोघेजण त्यांचे इतर ६ मित्र असे एकूण ८ जण प्रियदर्शनी पार्क, नेपियन्सी रोड, मलबार हिल येथील समुद्राच्या ठिकाणी सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पोहत होते. त्यांना खोल पाण्याचा अंदाज आला नाही व ते अचानकपणे समुद्रात ओढले जाऊन बुडू लागले.

त्यांनी जिवाच्या भीतीने आरडाओरड केली. रेहमान रिझवान शेख (१५) व मोहम्मद दिलशाद शेख (१२) हे दोघे समुद्रातील खोल पाण्यात ओढले गेले व समुद्रात बुडाले. मात्र त्यांचे सहा मित्र हे कसेतरी बचावले व समुद्र किनारी सुखरूप पोहोचले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने व पोलिसांनी समुद्रात बुडालेल्या रेहमान व मोहम्मद यांचा कसून शोध घेतला. अखेर त्या दोघांचा शोध लागला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर होऊन त्या दोघांचा मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here