जर तुम्हाला गुलाब आवडत असेल आणि तुमच्या जवळचे लोक तुम्हाला ते भेट देत असतील तर त्याच्या वाळलेल्या किंवा सुकलेल्या पाकळ्यांचा वापर करता येऊ शकतो. वाळलेल्या गुलाबांच्या पाकळ्या एक ते तीन वर्षांपर्यंत सहज साठवता येतात. यासाठी फक्त ते व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे.

वाळलेलं गुलाबापासून घरच्या घरी चहा तयार करता येऊ शकतो. यासाठी एका भांड्यात गुलाबाची वाळलेली फुलं घ्यावीत आणि त्यावर ३ कप उकळलेलं पाणी घाला. भांड्यावर झाकण ठेवा आणि पाकळ्या 20-30 मिनिटे पाण्यात राहू द्या. आता जेव्हा पाण्याचा रंग पूर्णपणे हलका लाल होईल. तेव्हा चहाच्या गाळणीतून पाकळ्या गाळून घ्या आणि चहाचा आनंद घ्या.

जर तुमच्या घरी वाळलेली गुलाबाची फुलं असतील तर तुम्ही त्यांचा वापर सामान्य मेणबत्ती सजवण्यासाठी करू शकता. यासाठी थोडे मेण गरम करून त्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि स्पार्कल पावडर टाका. मग त्यावर मेणबत्ती लावा. मेण जास्त थंड होणार नाही याची काळजी घ्या अन्यथा ते मेणबत्तीला नीट चिकटणार नाही.

तुम्ही दुकानातून विकत घेतलेले गुलाबपाणी वापरत असाल तर वाळलेल्या पाकळ्या तुमचे पैसे वाचवू शकतात. यासाठी तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात ३० मिनिटे उकळवाव्या लागतील. यानंतर पाणी गाळून हवाबंद डब्यात साठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here