@maharashtracity

धुळे: अनेक पुरस्कारांची मानकरी ठरेलेली तसेच उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय कुस्ती (National Wrestling) स्पर्धेत तांत्रिक अधिकारी पदाची यशस्वी जबाबदारी पार पाडणारी कुस्तीगीर कुमारी हर्षाली सैंदाने (Harshali Saindane) हिचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीतर्फे सत्कार करुन गौरव करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, युवती अध्यक्षा हिमानी वाघ, जिल्हा उपाध्यक्षा प्रितम देशमुख, जिल्हा सरचिटणीस, सरोज पवार, जिल्हा सचिव माधुरी पाटील उपस्थित होत्या.

खानदेश कन्या (Khandesh) हर्षाली चंद्रकांत सैंदाणे हिचा काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोंडा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तांत्रिक अधिकारी (कोच) म्हणून निवड झाली होती. ती जबाबदारी तिने यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली. एवढेच नव्हे तर या स्पर्धेसाठी तिची चौथ्यांदा निवड झाली असून, खानदेशातून निवड झालेली आजपर्यंत ती एकमेव महिला कोच आहे.

ही बाब खान्देशसाठी भूषणावह आहे. शिवाय, हर्षालीला कुस्ती क्षेत्रात सहभागासाठी सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन देणारे तिचे वडील चंद्रकांत सैंदाणे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here