तज्ज्ञांकडून उपचार, मार्गदर्शन आणि समुपदेशन

Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबईतील काळाचौकीच्या मनुभाई मेडिकल अँड रिसर्च सेंटरमध्ये फॅमिली फिजिशियन, एक्स रे, सोनोग्राफी, बाह्य रुग्ण विभाग, कान नाक घसा विभाग, नेत्रविकार विभाग, अस्थिव्यंगविकार विभाग, मौखिक आरोग्य, फिजिओथेरपी, हृदयविकार विभाग आणि मधुमेह विभाग अशा विविध सेवा सुविधा अत्यंत अल्प दरात उपलब्ध आहेत. शहर उपनगरातील विविध वैद्यकीय शाखेतील तज्ञ या सेंटरमध्ये रुग्णांना औषधोपचार देणार आहेत. स्टेट ऑफ द आर्ट संकल्पनेच्या धर्तीवर या सेंटरमध्ये अद्ययावत सेवा सुविधा आणि तंत्रज्ञान कार्यान्वित आहे.

या सेंटरमध्ये वैद्यकीय तपासण्यासाठी अत्यावश्यक वैद्यकीय चाचण्या, मूलभूत चाचण्या, अद्ययावत चाचण्या आणि सर्व समावेशक चाचण्या असे वर्गीकरण करण्यात आले आहेत. या चाचण्यांचे दर अगदी अत्यल्प म्हणजेच ६० रुपयांपासून ते हजार रुपयांच्या आत आहेत. या सेंटरचे प्रमुख डॉ सुहास पिंगळे यांनी अधिक माहिती देताना सांगितले, अनेकदा मध्यमवर्गीय रुग्णांना पालिका व शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा घेण्याची इच्छा असूनही अनेक अडथळे येतात. परिणामी या सेवा उपलब्धतेपासून नागरिकांना वंचित रहावे लागते. त्यामुळे परवडणाऱ्या दरात एका छताखाली दर्जात्मक वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. खासगी संस्था आणि रुग्णालयांच्या सेवा सुविधांप्रमाणे या केंद्रात सामान्यांना औषधोपचार मिळणार असल्याचे सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here