ऑल इंडिया फूड अँड ड्रग्ज फेडरेशनचा आरोप

Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांना औषधे उपलब्ध नसल्याचे सांगत लोकल औषध विक्रेत्यांकडून औषध खरेदी केली जातात. यामुळे लोकल औषध पुरवठादाराकडे औषधसाठा उपलब्ध नसल्यास रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही औषध खरेदी लोकल औषध पुरवठादारांना हाताशी धरुन केली जात असून यात पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यातील काही डॉक्टर गुंतले असल्याचा सनसनाटी आरोप ऑल इंडिया फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे. पालिकेच्या मध्यवर्ती औषध खरेदी विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पांडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई महापालिकेच्या औषध यादीत इंजेक्शन, आयबी, ग्लोज, गोळ्यांसह लहान मुलांना देण्यात येणारे सिरप, ओआरएसचा साठा उपलब्ध नाही. हा औषध साठा उपलब्ध नसल्यास पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाने नवीन निविदा मागवणे आवश्यक असताना त्या विभागाने तसे केले नाही. यातून पालिकेच्या ५ मेडिकल कॉलेज, २० पेरिफेअल रुग्णालये, ३० मॅर्टनिटी होम व १५० आपलं दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांचे औषधाविना प्रचंड हाल होत आहेत. याला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पांडे यांनी केला.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या मलेरिया, डेंग्यूची तपासणी करण्यासाठी लागणारे किट खरेदीसाठी ५० टक्के निविदा प्रक्रिया राबवली असून ५० टक्के निविदा प्रक्रिया राबवणे आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात मलेरिया व डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे पांडे म्हणाले. निविदा प्रक्रिया उशीरा राबवली जात असून यामुळे मुंबई महापालिकेला १५० कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. तीन वर्षांपूर्वी निविदा प्रक्रिया राबवताना निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्यांना कोण बाद झाले, कोणी किती किंमतीत सहभाग घेतला, किती दर फायनल झाले याची माहिती मिळत होती. मात्र मध्यवर्ती खरेदी विभागात बसलेले काही भ्रष्ट अधिकारी लोकल औषध पुरवठादारांना हाताशी धरुन औषधं खरेदी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

घोटाळयांचा पुरावा आयुक्तांना देणार

औषध खरेदी विभाग संबंधित गैरव्यवहारांची कागदपत्र उपलब्ध असून ती सर्व पुराव्यासाठी पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांना मेल करणार.”

– अभय पांडे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया फूड अँड ड्रग्ज फेडरेशन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here