@maharashtracity

मुंबई: केईएम रुग्णालयातील ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना बदलत्या पाळीनुसार काम देणे आवश्यक असतानाही त्यांना तसे करु दिले जात नाहीत. त्यामुळे ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. याठिकाणी रोटेशन पाळीत काम देण्याचे आदेश असतानाही त्या आदेशाला जुमानले जात नसल्याचे कर्मचारी सांगत आहेत. हे कर्मचारी अधिष्ठाता, प्रशासकीय अधिकारी आणि ग्रंथपाल यांना गुलाब पुष्प देऊन आंदोलन करणार असल्याचे म्युनिसिपल युनियनकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सध्या सर्व रुग्णालयांनी मस्टरवरील हजेरी बंद करून बायोमेट्रिक हजेरी सुरु करत असताना विभागातील कामाच्या वेळेप्रमाणे मनपाच्या धोरणानुसार कामगार यांना ड्युटी दिली जाईल असे आयुक्तांसमोर मान्य करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. या सुचनांची अंमलबजावणी करण्याच्या सुचना त्याच वेळी देण्यात आल्या.

मात्र केईएम रुग्णालय ग्रंथालय विभागातील प्रमुख ग्रंथपाल व कनिष्ठ ग्रंथपाल टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. केईएम रुग्णालयाच्या ग्रंथालय विभागातील कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करणे आवश्यक असतानाही हे सर्वजण दुपार पाळीतच काम करत ओहत. यांनी शिफ्टनुसार काम करावे असे आदेश अधिष्ठात्यांनी देऊन देखील ग्रंथपाल मात्र कर्मचाऱ्यांवर दुजाभाव करत असल्याचा आरोप होत आहे.

अशा प्रकारे केईएम रूग्णालय प्रशासन आणि ग्रंथालय विभाग यांनी महापालिका धोरणाला हरताळ फासलेला असून त्याच्या विरोधात ग्रंथालय विभागातील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांनी १ ते ४ ऑक्टोबर दरम्यान गांधीगिरी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे होणाऱ्या गैरसोयीस परिणामांचा रुग्णालय प्रशासन आणि ग्रंथालय विभागातील प्रमुख ग्रंथपाल आणि कनिष्ठ ग्रंथपाल जबाबदार राहतील असेही म्युनिसिपल मजदूर युनियनकडून सुचित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here