अधिष्ठात्याकडून बैठकीचे आयोजन

Twitter: @maharashtracity

मुंबई: पुअर पेंशट फंड (पीपीएफ) म्हणजेच गरीब रुग्ण सहायता निधी मिळण्यास विलंब होत असल्याने रुग्णांना नाहक त्रास सहल करावा लागत आहे. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. मात्र आता फंड मिळत नसल्याची बाब लक्षात घेऊन तसेच रुग्णांना निधी मिळण्यातील अडचणी वाढत असल्याने या प्रकरणी अधिष्ठाता डॉ प्रवीण राठी यांनी बैठक बोलावली आहे.

पीपीएफ अंतर्गत २०२१-२२ मध्ये ७४ लाख तर २०२०-२१ मध्ये ९४ लाखाचा फंड हा नायर रुग्णालयाला मिळाला होता. २०२१ पर्यंत माजी उप अधिष्ठाता डॉ. श्रीनिवास दास असताना आणि डॉ. रमेश भारमल अधिष्ठाता असताना नायर रुग्णालयातील गरीब रुग्णांना गरीब रुग्ण निधी मिळण्यात अडचणी येत नव्हत्या. मात्र, डॉ. अजय राणा यांनी उपअधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सहाय्यक अधिष्ठाता मनीषा मेस्त्री आणि डॉ. गौतम काळे यांच्यावर मर्यादा आणून आपात्कालीन वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अधिकार कमी केल्याने नायर रुग्णालयात सामाजिक संस्थांकडून मिळणारा निधी रुग्णांना मिळण्यात अडचणी येऊ लागल्या.

गरीब रुग्णांना निधी मिळत नसल्याने वारंवार सीएमओ आणि एएमओ यांच्याकडे निधी मिळण्यासाठी विचारणा होत आहे. त्यामुळे ते देखील हैराण झाले आहेत. याबाबत अधिष्ठाता डॉ. राठी यांच्याशी याबाबत चर्चा केली. शुक्रवारी यासंदर्भात बैठक घेण्यात येणार असून या संदर्भात तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राठी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here