Twitter : @maharashtracity

मुंबई: राज्यात २८ लाख विद्यार्थ्यांचे आधार मुल्यांकन झाले नसल्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याचे संकट निर्माण झाले होते. या गंभीर विषयाची दखल घेत भाजप शिक्षक आघाडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना प्रवेशित सर्वच विद्यार्थ्यांचा संच मान्यतेत समावेश करावा, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला सर्वच विद्यार्थ्यांचा संचमान्यतेत समावेश करावा असे निर्देश दिले होते. त्यामुळे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी व माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी आधार असलेले नसलेले सर्व विद्यार्थ्यांचा संचमान्य समावेश होणार असल्याचे पत्र ७ जून ला निर्गमित केले असल्याचे माहिती देण्यता आली.

सध्यस्थितीत किमान ८० टक्के विद्यार्थी वैध विचारात घेवून अंतरिम संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत, शाळांकडून विद्यार्थी वैध करण्याची कार्यवाही योग्य प्रकारे सुरु आहे. परंतु विद्यार्थ्याच्या नावातील तफावतीमुळे अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी अवैध ठरत असतील अथवा कांही विद्यार्थ्याकडे आधार कार्ड उपलब्ध नसतील व या विद्यार्थ्यामुळे शाळेतील सन २०२२-२३ च्या मंजुर पदावर विपरित परिणाम होत असेल तर अशा शाळा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे या प्रकारच्या विद्यार्थ्याच्या नावाच्या यादीसह अर्ज करतील व शाळांच्या बाबतीत संबंधित गटशिक्षणाधिकारी हे अशा विद्यार्थ्यापैकी जे विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित असतील तर अशा विद्यार्थ्याची शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्याकडून याबाबतची योग्य ती खात्री करतील व त्यांच्या पडताळणीमध्ये नियमित असलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी विचारात घेतले जातील. 

अशा प्रकारचे आदेश शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्याना दिल्यामुळे आता आधार कार्ड असलेले, नसलेले, झालेले, न झालेले मुल्यांकन अशा सर्वच विद्यार्थ्यांचा संचमान्यतेत समावेश होणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होण्यापासून वाचले व आता शिक्षकांना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याच्या रांगेतून सुटका मिळाली. राज्याच्या शालेय शिक्षण विभागानी मागणी मान्य केल्याबद्दल भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शिक्षण विभागाचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here