शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही
Twitter : @maharashtracity
मुंबई: एक राज्य एक गणवेश या भुमिकेवरुन युटर्न घेतलेला नाही असा दावा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला. सरकारी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकच गणवेश असावा यासाठी ही योजना आणली असून या आधीचे गणवेशाची ऑर्डर गेली असताना आता नव्या गणवेशाची पुर्तता कशी करावी, अशी अडचण शाळा व्यवस्थापकांसमोर आहे. तसेच गणवेशाची पुर्तता करणाऱ्यांसमोर देखील आहे. त्यामुळे ही योजना इतक्या कमी कालावधीत लागू करु नये, अशी मागणी देखील समोर येताना दिसून आली. त्यामुळे ही योजना पुढच्या वर्षी लागू होईल असे सांगण्यात आले. मात्र या योजनेवरुन कोणताही युटर्न घेतलेला नाही असा दावा केसरकर यांनी केला.
काही शिक्षकांनी आणि शालेय समित्यांनी ड्रेसची ऑर्डर दिली होती. त्यामुळे हे ड्रेस फुकट जाऊ नयेत म्हणून सध्या तयार केलेला एक ड्रेस थांबविण्याचे आदेश देण्यात आले. तसेच हा ड्रेस एक दिवस आड वापरला जाईल. सरकारचा गणवेश या वर्षी पासूनच सुरु होईल. पुढच्या वर्षी पासून एकच गणवेश लागू होईल. तसेच स्काऊट आणि गाईड हे विषय सक्तीचा करत आहे. त्याचा गणवेश घेण्यासाठी पाचशे ते सहाशे रुपये एका विद्यार्थ्याला खर्च करावा लागतो. गरिब मुलांना हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे स्काऊटचा जो गणवेश तोच राज्याचा गणवेश राहिल.