वैद्यकीय शिक्षण विभाग आयुक्तांनी घेतला बांधकाम प्रगतीचा आढावा

Twitter : @maharashtracity

मुंबई: राज्यातील पहिले सरकारी सुपर स्पेशालिटी रुग्णालय म्हणून मुंबईतील जे जे रुग्णालय उभे राहत आहे. या रुग्णालयाची इमारत २०२४ पर्यंत पूर्ण उभी करण्याचा मानस असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रणजित शिंगाडे यांनी व्यक्त केले. दरम्यान, गुरुवारी रुग्णालय बांधकाम कार्यक्षेत्राला वैद्यकीय शिक्षण विभाग आयुक्त राजीव निवतकर यांनी भेट दिली. यावेळी जे जे रुग्णालय समुहाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे देखील उपस्थित होत्या.

सुपरस्पेशिलिटी इमारतीच्या ए, बी, सी, डी ब्लॉकचे बांधकाम कुठपर्यंत आले याची माहिती अभियंता शिंगाडे यांनी आयुक्त निवतकर यांना दिली. यावेळी आयुक्त यांनी कार्यवाही बाबतच्या सुचना दिल्या. जे जे रुग्णालय सुपरस्पेशालिटी करण्याचे नियोजन २०१२ पासून सुरु झाले. मात्र बांधकामाचे ठरत असताना त्या मान्यतेसाठी प्रयत्न सुरु झाले. या कामाला दोन वेळा मान्यता देण्यात आली. प्रत्यक्षात मान्यतेनंतर काम सुरु करण्यात आले.

अभियंता शिंगाडे यांनी सांगितले की, राज्यातील हे सर्वात मोठे सुपरस्पेशालिटी सरकारी रुग्णालय असणार आहे. बाराशे बेडचे हे रुग्णालय असून या संपूर्ण बेडचे प्रत्येक विभागानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. दोन बसमेंट अधिक तळमजला अधिक दहा मजले अशी इमारत आहे. इमारत उभारणीचे काम सुरु असून पाचव्या मजल्यापर्यंत काम झाले आहे. पुढील काम टप्प्याटप्प्याने सुरु आहे. आता काम वेगात होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

न्युरो सर्जरी, न्युरोलॉजी हार्ट सर्जरी अशा महत्वाच्या विविध विभागांसह ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल राहणार आहे. आरसीसी स्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर यासह मनपाची ओसी मिळाल्यानंतर रुग्णालय आरोग्य विभागाला सुपूर्द करण्यात येईल. रुग्णालयाला आवश्यक असलेल्या गरजा पुर्ण करताना थोडा वेळ लागणार आहे. तर स्थापत्य कामासाठी एक वर्ष जाईल असा अंदाज शिंगाडे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here