By Sachin Unhalekar

Twitter: @Rav2Sachin

मुंबई: मुंबई अग्निशमन दलाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांची यादी आज महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर (mcgm.gov.in ) जाहीर झाली आहे. यादीतील उमेदवारांची येत्या आठ – दिवसानंतर आरोग्य चाचणी झाल्यानंतर सहा महिने अग्निशमन दलाचे प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर उमेदवार प्रत्यक्ष ड्युटीवर रुजू होणार असल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांकडून मिळाली.

वर्ष 2017 मध्ये अग्निशमन जवान पदी 774 जागांसाठी भरती झाली होती. यामध्ये 117 जागा या महिलांसाठी होत्या. यानंतर सहा वर्षांनी म्हणजे डिसेंबर 2022 रोजी एकूण 910 अग्निशमन जवान पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

आज 910 जागांपैकी 873 जागांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 273 महिलांसाठी राखीव ठेवलेल्या जागांकरिता पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, दिव्यांग वर्गासाठी एकूण 37 जागा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आज महापालिकेची अधिकृत वेबसाईट mcgm.gov.in वर जाहीर झाली. पात्र ठरलेल्या उमेदवारांची आरोग्य चाचणी होणार आहे. यासंदर्भात येत्या आठ ते दहा दिवसांत पात्र ठरलेल्या उमेदवारांना आरोग्य चाचणी संदर्भात त्यांना कळविले जाणार आहे. शारीरिक चाचणी झाल्यानंतर सहा महिने अग्निशमन दलाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्यक्षात उमेदवार ड्युटीवर रुजू होतील, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here