तपासणीतून १४ लाखांचे सोने लपवल्याचे उघड

मुंबई: एका तीस वर्षाच्या पुरुषाने २४० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या पट्टया शरिरात लपवून आणत असताना सीमाशुल्क अधिकाऱ्याने संशयित म्हणून ताब्यात घेतले. या व्यक्तिला तपासणीसाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याच्या शरिरात सोने असल्याचे वैद्यकीय अहवाल समोर आला. दरम्यान, या सोन्याची १४ लाख रुपये किंमत असल्याचे सांगण्यात आले. हे सोने बाहेर काढण्यासाठी आता शस्त्रक्रियेची गरज लागणार असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

उत्तर प्रदेश रामपूर येथील इंतिजार अली रियासत अली याला मुंबईतील विमानतळावर सीमाशुल्क अधिकारी वेणुगोपालन यांनी आठ मे रोजी ताब्यात घेतले. या प्रवाशाला कस्टम अधीकाऱ्यांनी संशयास्पदरीत्या काही अवैध वस्तू शरीरात लपवल्याच्या संशयावरुन हटकले. त्यावेळी गोंधळलेल्या इंतिजार अलीने त्वरित सोने शरिरात गिळले असल्याचे कबुल केले. त्यामुळे कस्टम अधिकाऱ्यांनी इंतिजार अलीला दुपारी सर जेजे रूग्णालयातील अपघात विभागात दाखल केले.  जे जे रुग्णालयाचे प्रा. डॉ. अजय भंडारवार यांनी  रुग्णाची तपासणी केली. रेडिओलॉजिकल तपासणीत एकाहून अधिक धातूंच्या वस्तू त्याच्या पोटात असल्याचे दाखवले. शरिरात बॉडी पॅकर पद्धतीने कोकेन किंवा हिरोईन गोळ्यांचे देखील वहन केले जात असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. मात्र धातूचे शरीरात लपवून वहन करणे आव्हानात्मक असून यामुळे आतड्यांसंबंधीत त्रास उद्भवू शकतात असे येथील तज्ज्ञांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here