@maharashtracity

१० टक्के लसवंत मुंबईबाहेरील असण्याची शक्यता

मुंबई: लसीकरणात मुंबईची घोडदौड १०० टक्क्यांकडे सुरु असताना किती लसवंत मुंबईकर तर किती लसवंत मुंबई बाहेरील याबाबत माहिती घेणे सुरु आहे.

दरम्यान, सध्या लसवंतांच्या उपलब्ध आकडेवारीनुसार सगळेच लाभार्थी पालिकेच्या २४ वॉर्डातील नसल्याचा अंदाज करण्यात येत आहे. तर मुंबईत लस घेतलेल्यांमध्ये १० टक्के लसवंत मुंबईबाहेरील असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेचे (BMC) अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी सांगितले की, मुंबईतील लस घेतलेल्यांमध्ये १० टक्के मुंबईच्या बाहेरील असण्याची शक्यता आहे. पूर्व उपनगरातील मुलुंड (Mulund) किंवा पश्चिम उपनगरातील दहिसरसारख्या (Dahisar) पालिकेच्या सीमेवरील लस केंद्रांवर अनुक्रमे ठाणे (Thane) किंवा भाईंदर (Bhayander) परिसरातून लस घेण्यास असल्यास त्यांना लसीला नकार देऊ शकत नाही, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

Also Read: राज्यात कोरोनाचे ११९३ नवीन रुग्ण

म्हणूनच २४ वॉर्डातील किती मुंबईकरांनी लस घेतली याची माहिती काढण्याचे काम २४ वॉर्डातील वॉर रुमवर (War Room) सोपविण्यात आले आहे. कोविड (covid) तीव्र असताना देखील पालिकांच्या कोविड केंद्रांमध्ये (covid centres) दाखल होणारे रुग्ण हे मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातीलच नव्हते तर ते मुंबई बाहेरील देखील होते, ही बाब स्पष्ट झाली आहे.

त्याप्रमाणेच लसवंतांची आकडेवारी देखील कमी जास्त होऊ शकते असा अंदाज आता अधिकारीच वर्तवू लागले आहेत. दरम्यान, काही तज्ज्ञांच्या मते मुंबईत प्रवास करणारे हे उपनगरातील तसेच बाहेरील जिल्ह्यामधींल देखील आहेत. लसीकरण कार्यक्रम (vaccination drive) हा १६ जानेवारी रोजी सुरु झाला असून या कार्यक्रमातंर्गत लस देण्यावरच भर देण्यात आली होती.

लस न घेतलेल्या वस्त्या सोसायट्यांच्या शोधात पालिका

यावर बोलताना काकाणी यांनी सांगितले की, लसीकरणाचे केंद्र वाढविण्यात आली होती. दुसरा डोस न घेतलेल्या ३ लाख नागरिकांचा डाटा २४ वॉर्डमधील वॉर रुममध्ये विभागून देण्यात आला आहे. त्यांना संपर्क करण्यात येणार असून जर त्यांनी मुंबईबाहेर दुसरा डोस घेतला असेल तर त्यांना वगळण्यात येईल.

तसेच मुंबईत पहिला डोस घेतला असून दुसरा डोस घेतला नाही अशांना लगेचच दुसरा डोस घेण्यास सुचित करण्यात येईल, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले. तसेच यातून एखाद्या वस्ती-सोसायटीने १०० टक्के लसीकरण करुन घेतले आहे किंवा एखाद्या वस्ती-सोसायटीने लसीकरण करुन घेतलेच नाही अशांची माहिती देखील यातून मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here