Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबईत आज शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरण पसरले होते. यातून मुंबई, पूर्व-पश्चिम उपनगरे, ठाणे तसेच नवी मुंबईतील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी झाल्या. यात बोरिवली, पवई, नवी मुंबई तसेच मुलुंड परिसरात पाऊस झाला. सकाळच्या पावसाने वातावरणात गारवा पसरला होता. मात्र हा मान्सून नसून पूर्व मान्सूनच्या सरी असल्याचे मुंबई वेधशाळेकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवार २६ आणि मंगळवारी २७ जून रोजी मुंबईसाठी येलो अलर्ट घोषित केला आहे. काही तुरळक ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, शुक्रवारी सिंधुदूर्ग जिल्ह्यातही दिवसभर पाऊस होता. तर विदर्भात मान्सूनने प्रवेश केला असल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून घोषित करण्यात आले. हवामान विभागाने २३ जूनपासून कोकणात तसेच मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात पावसाचा अंदाज केला होता. त्याप्रमाणे या तिन्ही प्रादेशिक भागात पावसाचे वातवरण होते. त्याचवेळी २४ ते २५ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज करण्यात आला आहे. यात मुंबईसाठी २६ ते २७ जून अशा कालावधीसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. यातून किरकोळ ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता आहे.

मुंबईतील मान्सून पुरक वातावरण पाहता मुंबईत मान्सूनने प्रवेश घेतल्याचा अंदाजही करण्यात येत आहे. मात्र, आगामी दोन दिवसात हे पुरक वातावरण सक्रिय राहून पाऊस झाल्यास मान्सून दाखल होण्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे एका हवामानशास्त्र विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. तुर्तास शुक्रवारची सकाळ तुरळक सरींची आणि ढगाळ वातावरणाची असली तरी दुपारपासून मुंबईत कडक उन्हं पडले होते. त्यामुळे अर्ध्याहून अधिक दिवस मुंबईकर उष्म्याने घायाळ झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here