असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट संघटनेची योजना

Twitter: @maharashtracity

मुंबई: गेल्या सहा वर्षातील डॉक्टरांवरील हल्ल्याची आकडेवारी पाहिल्यास ६३६ हल्ले इतकी आहेत. या प्रकरणी १,३८१ संशयितांपैकी ६३६ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर ५०४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, आतापर्यंत केवळ चार जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. डॉक्टरांवरील हल्ले ही गंभीर बाब ध्यानात घेऊन असोसिएशन 

ऑफ मेडिकल कन्सल्टंट संघटनेने पुढाकार घेऊन खासगी सुरक्षा यंत्रणाच सज्ज ठेवली आहे. यात डॉक्टरने फोन केल्याबरोबर त्वरीत सुरक्षा रक्षक हल्ल्याच्या ठिकाणी येऊन डॉक्टरांना सुरक्षा देणार आहेत.

दरम्यान, ही सुरक्षा सेवा जागतिक डॉक्टर दिन २ जुलै पासून सुरु करण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे. चर्चगेट, भाईंदर, ठाणे तसेच खारघर दरम्यान प्रॅक्टिस करणाऱ्या १३०० सदस्य डॉक्टरांसाठी उपलब्ध राहणार असल्याचे सांगण्यात आले. सदस्यांसोबत केलेल्या करारानुसार, मोटारसायकलवर वाहणारे सुरक्षा कर्मचारी डॉक्टरांनी त्याच्या/तिच्या मोबाईल फोनवर डिजिटल कोड दाबल्यानंतर नऊ ते १५ मिनिटांत घटनास्थळी पोहोचणार असल्याचे असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट संघटनेचे डॉ. ललित कपूर यांनी सांगितले. 

प्रत्येक घटनास्थळाच्या मर्यादेनुसार सुरक्षा रक्षकांची प्रतिसाद वेळ राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ही योजना डॉक्टरांना केवळ सुरक्षाच देणार नसून डॉक्टरांना त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आल्यास त्यांसाठी वैयक्तिक आपत्कालीन स्थितीत देखील हे सुरक्षा रक्षक मदतीला जाणार असल्याचे डॉ. सुधीर नाईक यांनी सांगितले.

वर्ष                 हल्ले                   आरोपी

२०१६                ९३                       २२३
२०१७               १००                      २५८
२०१८                ८३                       १८७
२०१९                ७७                       १५७
२०२०               १८४                       ३८१
२०२१                 ९९                       १७५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here