Twitter : @maharashtracity

मुंबई: दहीहंडी उत्सवाची वेळ रात्री १२ पर्यंत करावी, तसेच गोपालकालाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी आणि दहीहंडी मंडळावर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा शहराध्यक्ष आनंद परांजपे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांच्यासह गोविंद मंडळांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी येथे भेट घेऊन निवेदन दिले.

या निवेदनात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बालगोपाळांचा विमा उतरविण्यात यावा. दहीहंडी खेळाला साहसी दर्जा देण्यात आला आहे. मात्र याबाबत सरकारमार्फत उपाययोजना झालेली नाही. साहसी खेळासाठी पुढाकार घेऊन सरकार व दहीहंडी पथकांमध्ये समन्वय साधून या साहसी खेळासाठी स्पर्धा आयोजित करण्यात यावी. आयोजकांवर ज्या जाचक अटी लादण्यात आल्या आहेत, त्या शिथील कराव्यात, आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here