Twitter : @MilindMane70

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार होण्याअगोदर राष्ट्रवादीच्या नऊ बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री पद व मंत्रिपद प्राप्त केल्यानंतर पवारांची पावर काय असते, याची झलक आठच दिवसात राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना व आमदारांना पहावयास मिळाली आहे. 

राज्यातील शिंदे -फडणवीस व पवार यांच्या पक्षातील आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होऊन पुन्हा एकदा विस्तार होण्याआधीच अजित पवारांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना मंत्र्यांची दालने व बंगल्यांचे वाटप करून घेतले आहे. 

नव्याने मंत्री झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आज मंत्रालयात दालन व बंगल्यांचे वाटप करण्यात आले, ती पुढीलप्रमाणे,

छगन भुजबळ, मंत्रालय मुख्य इमारत, दुसरा मजला, दालन क्रमांक 201 दक्षिण बाजू (निवासस्थान ब-6, सिद्धगड)
हसन मियालाल मुश्रीफ, मंत्रालय विस्तार इमारत, चौथा मजला, दालन क्रमांक 407 (निवासस्थान क-8 विशालगड)
दिलीप दत्तात्रेय वळसे – पाटील, मंत्रालय मुख्य इमारत, तिसरा मजला, दालन क्रमांक 303, उत्तर बाजू (निवासस्थान क-1 सुवर्ण गड)
धनंजय पंडितराव मुंडे, मंत्रालय विस्तार इमारत, दुसरा मजला, दालन क्रमांक 201 ते 204, 212 (निवासस्थान क-6 प्रचित गड)
धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम, मंत्रालय विस्तारित इमारत, सहावा मजला, दालन क्रमांक 601, 602 व 604 (निवासस्थान सुरुची-3)
अनिल भाईदास पाटील, मंत्रालय मुख्य इमारत, चौथा मजला, दालन क्रमांक 401, दक्षिण बाजू (निवासस्थान सुरुची-8)
संजय बाबुराव बनसोडे, मंत्रालय मुख्य इमारत, तिसरा मजला, दालन क्रमांक 301, दक्षिण बाजू (निवासस्थान सुरुची-18)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वीपासून विरोधी पक्ष नेते पदाचा बंगला असल्याने त्यांना निवासस्थान वाटप झाली नाही. तर राष्ट्रवादीचे नेते व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती सुनील तटकरे यांना मंत्रालयातील दालन व निवासस्थान याचे वाटप झाले नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यात याबाबत तर्क – वितर्क लढवले जात आहेत.

राज्य मंत्रिमंडळात चार दिवसापूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना दालन व निवासस्थानाचे वाटप करण्याचे काम अजित दादांच्या पावर मुळे झाले असल्याने भविष्यात अजित दादांची पावर मंत्रिमंडळात चालेल, यात शंका नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here