Twitter : @vivekbhavsar

महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकलामुळे मोकळा झाला आहे. यामुळे येत्या काही दिवसात राज्यातील शिंदे -फडणवीस- पवार सरकारकडून राज्यपालांना आमदारांची यादी दिली जाईल आणि त्यांचा शपथविधी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या रिक्त 12 जागांपैकी सहा जागा भाजपच्या वाट्याला येणार असून प्रत्येकी तीन जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार असताना ज्या 12 आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता, त्यांच्या जागी नव्याने नियुक्ती करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे पाठवलेल्या नावांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी फेटाळून लावत नव्याने नावे देण्याची मागणी केली होती. कोश्यारी राज्यपालपदी असेपर्यंत त्यांनी या पदांना भरण्याची मंजुरी दिली नाही.

दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या नावांच्या निकषाला न्यायालयात आव्हान दिले गेल्याने ही नियुक्ती रखडली होती. सर्वोच्च न्यायालयामध्ये याचा निकाल लागला असून आता या बारा आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

या बारा जागा भरताना सहा सदस्य भाजपचे असतील तर शिंदे आणि पवार यांच्या गटाचे प्रत्येकी तीन सदस्य असतील. या नियुक्तीमुळे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील संख्याबळ वाढणार आहे. सध्या वरिष्ठांच्या या सभागृहात भाजपचे २२ सदस्य असून त्यात सहाने वाढ होणार आहे. 

शिवसेनेचे एकूण 11 सदस्य असून त्यातील तीन सदस्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे आठ सदस्य राहिले आहेत. राज्यपाल कोट्यातील आमदारांच्या नियुक्तीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सदस्य संख्या सहा होणार आहे तर राष्ट्रवादीच्या विद्यमान ९ सदस्यांमध्ये आणखी तिघांची भर पडणार आहे.

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांसह एकूण 21 पदे आज घडीला रिक्त आहेत. राज्यपालांनी शिफारस केलेल्या आमदारांच्या नियुक्तीनंतर विधान परिषदेतील पक्षीय बलाबल बदलण्यासोबतच घटनात्मक पदावर देखील त्याचा परिणाम होणार आहे. अजित पवार यांची  राष्ट्रवादी कोंग्रेस  शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे आणि राष्ट्रवादीचे बलाबल वाढणार असल्यामुळे सभापतीपदी अजित पवार यांच्या गटातील रामराजे नाईक निंबाळकर यांची नेमणूक केली जाणार आहे. तर उद्धव गटाकडून एकनाथ शिंदे गटाकडे आलेल्या डॉ नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापती पडला त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत मुदतवाढ देण्यात येईल. डॉ गोऱ्हे यांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपत आहे. पुढील तीन वर्षे त्या उपसभापती पदावर राहू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here