Twitter : @maharashtracity

मुंबई

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजेच आपला दवाखान्यांच्या संख्येत नवीन १५ दवाखान्यांची भर पडली असून यामुळे पालिका क्षेत्रात आपला दवाखान्यांची संख्या आता १८७ झाली आहे. यामध्ये २७ पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर आणि १६० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना समाविष्ट आहेत. दरम्यान डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत आपला दवाखान्यांची संख्या २५० पर्यंत नेण्याचे लक्ष्य महानगरपालिकेने ठेवले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  

यापूर्वी आपला दवाखान्यांची संख्या १७२ होती. ज्यात २५ पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर आणि १४७ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (Hinduhruday Samrat Balasaheb Thackeray Aapala Dawakhana) यांचा समावेश होता. आता १५ नवीन दवाखाने आरोग्य सेवेतील रुजू झाल्याने ही संख्या आता १८७ झाली आहे. या दवाखान्यांच्या माध्यमातून आतापर्यंत १५ लाखांहून अधिक नागरिकांनी आरोग्य सुविधेचा लाभ घेतला आहे. आगामी काळात २५० आपला दवाखाना कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांनी सांगितले. नवीन सर्व दवाखान्यांच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी आरोग्य सेवा रुजू करण्यात आली असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here