Twitter : @maharashtracity
मुंबई
बेस्ट कामगारांची कॅटींन सुविधा बंद केल्याने कर्मचारी नाराज झालेच. मात्र आगारांमधील कॅटींन तसेच स्वच्छतागृहे अस्वच्छतेच्या विळख्यात होती. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांनीच हातात झाडू घेऊन कॅटींन आणि अस्वच्छतागृह स्वच्छ केली असल्याचे सांगण्यात आले.
यावर बोलताना बेस्ट समितीचे ज्येष्ठ सदस्य सुनील गणाचार्य यांनी सांगितले की, बेस्ट प्रशासनाने आर्थिक खर्च कमी करण्यासाठी राबवत असलेल्या कटु ऊपाययोजनामधे बेस्ट कामगारांच्या सुविधा बंद करून टाकल्या. त्यातली एक प्रमुख सुविधा ती म्हणजे कॅन्टींन बंद करून करणे, त्यामुळे कामगारांना जेवणाची असुविधा निर्माण झाली. तसेच सफाई कामगारांची भरती बंद केली. आगारातील कँटीन, स्वच्छतागृहाची निट साफसफाई होत नसल्याने सर्वत्र घाण, दुर्गंधी पसरत आहे. त्याचा परिणाम आज सेवा देत असलेल्या कामगारांच्या आरोग्यवर होत आहे. याची बेस्ट प्रशासनाने दखल घेतली नाही. म्हणून भाजपा कामगार आघाडीचे संयोजक सुनिल गणाचार्य तसेच सरचिटणीस डॉ. अमित भोसले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानानुसार भारतीय ७७ व्या स्वातंत्र्य वर्धापनादिनानिमित्त बेस्ट ऊपक्रमातील विविध आगारात स्वच्छतागृह, विश्रांतीगृह, उपहारगृह, कार्यालयीन ठिकाणे कामगारांनीच हातात झाडू घेऊन स्वच्छ केली. आतातरी बेस्ट प्रशासनाचे डोळे उघडतील का असा सवाल या वेळी विचारण्यात आला.