राज्यात ३२८ रुग्णांची नोंद

Twitter: @maharashtracity

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोविड संसर्ग (Covid pandemic) पसरण्यास सुरुवात झाल्याने रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कोविड मृत्युदेखील होत आहेत. सोमवारी मुंबईत कोविडने एकाचा बळी घेतला असून एप्रिल महिन्यातील मुंबईतील हा तिसरा मृत्यु असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

याआधी ५ आणि ६ एप्रिल रोजी या महिन्यातील कोरोना मृत्यू नोंदविण्यात आले होते. तर सोमवारी ९५ कोरोना रुग्ण (corona patients) आढळून आले आहेत. आतापर्यंत मुंबईत १,१५,८६० कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत मुंबईत १९,७५० रुग्णांचा मृत्यु झाला आहे. याशिवाय मुंबईत आजघडीला १४५४ सक्रिय कोरोना रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, राज्यात सोमवारी ३२८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्युदर (death rate) १.८२ टक्के आहे. राज्यात २४७ रुग्ण बरे होवून घरी गेले असून आजपर्यंत ७९,९७,१३० कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९८.१२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६७,१०,८६६ प्रयोगशाळा नमुन्यापैकी ८१,५०,२५७(०९.४०टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here