Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबईत आगीच्या घटना वाढल्या असून गुरुवारी लागलेल्या आगीत दोघ जण होरपळली असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. या दोघांवरही केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथील सिद्धी प्रभा इमारतीतील पहिल्या मजल्यावर गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग स्टोव्हमधील केरोसीनच्या भडक्यामुळे लागल्याचे सांगण्यात आले. मात्र, घरात त्यावेळी अग्नीजन्य साहित्य असल्याने आग अधिक भडकली. सात वाजून वीस मिनिटांनी अग्निशमन दलाने त्या ठिकाणी धाव घेतली. यात पुजा चौरसिया (२८) आणि दिलीप चारसिया (४५) असे दोघे भाजले. त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यता आले. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here