Twitter: @maharashtracity

मुंबई: देशासह राज्यातील कोरोना रुग्णसंख्या सतत वाढत असल्याने चिंताही वाढत आहे. राज्यात शुक्रवारी ९२६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८१,४८,५९९ झाली आहे. काल ४२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. 

राज्यात आजपर्यंत एकूण ७९,९५,६५५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१२ टक्के एवढे झाले आहे. तर राज्यात शुक्रवारी तीन कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६६,८७,६५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,४८,५९९ (०९.४० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४४८७ सक्रिय रुग्ण आहेत. 

दरम्यान, सध्याच्या कोविड संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर  भारत सरकारच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्यापासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. यामध्ये सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून २ टक्के प्रवाशांचे नमुने कोविडसाठी घेण्यात येत आहेत. यापैकी कोविड बाधित आलेला प्रत्येक नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत विमानतळावरील या तपासणीचा तपशील याप्रमाणे. एकूण १७,२९,१४१ आलेले प्रवासी असून ३८,५६५ एवढ्या प्रवाशांची आरटीपीसीआर केली आहे. तर ६० जणांचे नमुने आरटीपीसीआर आणि जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here