Twitter: @maharashtracity
नागरिकांना, आधार संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विशेष “आधार सेवा केन्द्रांची” (आस्क) उभारणी भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) केली आहे. मुंबईतील अंधेरी साकीनाका, ठाणे आणि वाशी या तीन ठिकाणी यूआयडीएआय आधार सेवा केंद्रांची सुविधा उपलब्ध आहे. येथे समर्पित आधार नोंदणी आणि आधार अद्ययावत करणे यासारख्या सेवा पुरवल्या जातात. यूआयडीएआय मुंबई प्रादेशिक कार्यालय भविष्यात आणखी नवे आधार सेवा केंद्र सुरु करणार आहे.
आधार सेवा केन्द्रात उपलब्ध आधार सुविधा
आधार सेवा केन्द्रात येणाऱ्या रहिवाशांना आरामदायक वातानुकूलित वातावरण उपलब्ध केले आहे.येथे व्हिलचेअरचीही सुविधा असून ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगासाठी विशेष सोय केली आहे.ही केन्द्रे आठवड्याचे सातही दिवस सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत खुली असतात.
नागरिक, खालील सेवांसाठी कोणत्याही सोयीच्या आधार सेवा केन्द्राला भेट देऊ शकतात :
आधार नोंदणी त्यांच्या आधारमधील कोणत्याही लोकसंख्याशास्त्रीय माहितीचे अद्ययावतीकरण – नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख, भ्रमणध्वनी क्रमांक किंवा ईमेल आयडी त्यांच्या आधारमधील बायोमेट्रीक माहितीचे अद्ययावतीकरण – छायाचित्र, बोटांचे ठसे आणि डोळ्यांद्वारे ओळख पडताळणी
आधार डाउनलोड करणे आणि छापील प्रत देशभरातील कोणत्याही आधार सेवा केन्द्रात कोणत्याही भारतीय नागरिकाला (परदेशस्थ भारतीयासह) या सेवा उपलब्ध आहेत.
आधार सेवांसाठी ऑनलाईन भेटीची वेळ घेणे (अपॉइंटमेंट)
यूआयडीएआयने आधार सेवा केंद्र प्रकल्पांसोबतच ऑनलाइन भेटीची नोंदणी करण्याचीही सुविधा नागरिकांसाठी सुरु केली आहे. सर्व यूआयडीएआय संचालित आधार सेवा केन्द्रांमधे ही सेवा पुरवली जाते. कोणताही भारतीय येथे आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणासाठी कोणत्याही सोयीच्या आधार सेवा केन्द्रात ऑनलाईन भेटीची नोंदणी करु शकतो.
कोणताही नागरिक स्वतः साठी किंवा कुटुंबातील सदस्यासाठी https://appointments.uidai.gov.in/bookappointment.aspx या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करु शकतो. ही सेवा निःशुल्क असून आधार नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकाचीही याकरिता आवश्यकता नाही. एक नागरिक महिन्यात कमाल चार भेटींची नोंदणी करु शकतो.
बँका, टपाल कार्यालये, राज्य सरकारी कार्यालये आणि बीएसएनएल केंद्रांमध्ये इतर आधार केंद्रे उपलब्ध आहेत. तिथेही ही ऑनलाईन भेट नोंदणी सुविधा उपलब्ध केली जात आहे.
आधार सेवा केंद्रातील आधार सेवांसाठीचे शुल्क
नागरिकांकरिता कोणत्याही सोयीच्या आधार सेवा केंद्रातील सेवांसाठीचे शुल्क यूआयडीएआयने जारी केले आहे. ते याप्रमाणे:
आधार नोंदणी : नि:शुल्क
बालकांसाठी अपरिहार्य बायोमेट्रीक अद्ययावतीकरण (5 ते 7 आणि 15 ते 17 वर्षे): नि:शुल्क
लोकसंख्याशास्त्रीय अद्ययावतीकरणासह किंवा त्या व्यतिरिक्त कोणतेही बायोमेट्रीक अद्ययावतीकरण : 100 रुपये
नागरिकांद्वारे केवळ लोकसंख्याशास्त्रीय अद्ययावतीकरण : 50 रुपये
आधार डाउनलोड करणे आणि रंगीत छापील प्रत : 30 रुपये
आधारमधे कागदपत्रे अद्ययावत करणे : 50 रुपये