गेल्या वर्षीच्या तुलनेत २२.९ टक्के वाढ

Twitter: @maharashtracity

मुंबई: पश्चिम रेल्वेने २०२२ – २३ आर्थिक वर्षात आतापर्यंतची सर्वाधिक मालवाहतूक करत १०८ दशलक्ष टनाचा टप्पा ओलांडला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत २२.९ टक्के वाढ झाली आहे. परेच्या या कामगीरीबद्दल पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी कौतुक केले आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या ८७.९१ दशलक्ष टनांच्या तुलनेत यावर्षी (२०२२-२३) पश्चिम रेल्वेने २२.९ टक्केची झेप घेतली आहे. हा टप्पा गाठताना, पश्चिम रेल्वेचे लोडिंग हे भारतीय रेल्वेच्या सर्व विभागीय रेल्वेंमध्ये सर्वाधिक २०.१७ मेट्रिक टन लोडिंग आहे. या यशासह, पश्चिम रेल्वेने १०० मेट्रिक टन मालवाहतूक क्लबमध्ये प्रवेश केला आहे. विविध वस्तूंच्या वाहून नेणाऱ्या पश्चिम रेल्वेने कोळसा लोडिंगमध्ये केवळ १५.१ टक्के वाटा घेऊन क्लबमध्ये प्रवेश करणारी पहिली नॉन-कोल बेल्ट रेल्वे झोन बनली आहे.

ठाकूर म्हणाले की २०२२ -२३ या आर्थिक वर्षात कंटेनर, खते आणि खनिज तेलाच्या श्रेणींमध्ये भारतीय रेल्वेच्या एकूण लोडिंगमध्ये पश्चिम रेल्वेचा वाटा सर्वात मोठा आहे. कंटेनरच्या लोडिंगमध्ये पश्चिम रेल्वेचा वाटा सुमारे ३४.१ खतांमध्ये ३२ आणि खनिज तेलामध्ये २२.८ आहे. पश्चिम रेल्वेने मागील वर्षीच्या तुलनेत विविध वस्तूंच्या लोडिंगमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. कोळशाच्या वाहतुकीत १३६.४ टक्के वाढ झाली आहे, तर अन्नधान्याच्या वाहतुकीत ५२.८ टक्के वाढ झाली आहे. पीओएल उत्पादनांचे लोडिंग २४.४ खत १४.२, सिमेंट १४ मीठ १० आणि कंटेनर लोडिंग ८ टक्क्यांनी वाढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here