लोकशाहीतील विविधता, चळवळीवरील धडे आदी धड्यांना बगल

Twitter: @maharashtracity

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदकडून (एनसीईआरटी) बारावीच्या इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. यात अनेक धडे अभ्यासक्रमातून वगळण्यात आले असून यात प्रामुख्याने मुघल साम्राज्याचा इतिहासासह दहावीच्या पुस्तकातील लोकशाहीतील विविधता, लोकप्रिय संघर्ष आणि चळवळीसारखे अनेक धडे वगळण्यात आले आहेत. (NCERT changes syllabus)

पाठ्यपुस्तकातील हे बदल शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून लागू असणार आहेत. एनसीईआरटीची पाठ्यपुस्तके वापरणाऱ्या सीबीएसई व युपी बोर्डासह इतर सर्व बोर्डांना हे बदल लागू असणार आहेत.

एनसीईआरटीने ’किंग्स अँड क्रॉनिकल्स; मुघल दरबार (१६वे आणि १७वे शतक)’ ’थीम ऑफ इंडियन हिस्ट्री भाग २’ ही प्रकरणे इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकण्यात आली आहेत. इतिहासासोबतच नागरिकशास्त्राचा अभ्यासक्रम देखील बदलला आहे. ’अमेरिकन हेजेमनी इन वर्ल्ड पॉलिटिक्स’ आणि ’द कोल्ड वॉर एरा‘ यासारखे धडे काढून टाकण्यात आले आहेत. तसेच, बारावीच्या ’इंडियन पॉलिटिक्स आफ्टर इंडिपेंडन्स‘ या पाठ्यपुस्तकातून ’राइज ऑफ पॉप्युलर मूव्हमेंट्स‘ आणि ’एरा ऑफ वन-पार्टी डोमिनेन्स‘ हे प्रकरण वगळण्यात आली आहेत. 

तसेच एनसीईआरटीने दहावी आणि अकरावीच्या पाठ्यपुस्तकातही काही बदल केले आहेत. ’थीम इन वर्ल्ड हिस्ट्री‘ या अकरावीच्या पाठ्यपुस्तकातून ’सेंट्रल इस्लामिक लँड्, ’क्लॅश ऑफ कल्चर‘ आणि ’इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन‘ यांसारखे धडे काढून टाकण्यात आले आहेत. यासोबतच दहावीच्या ’डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स या पाठ्यपुस्तकातून ’लोकशाही आणि विविधता‘, ’लोकप्रिय संघर्ष आणि चळवळी‘, ’लोकशाहीची आव्हाने‘ हे प्रकरणे वगळण्यात आली आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here