Twitter : @maharashtracity

मुंबई

राज्यात जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण केली. यात १८ जिल्ह्यातील ३८८ गावे पूरग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. या ३८८ गावांमध्ये एकणू ३ लाख ४६ हजार ५०३ नागरिक प्रभावित झाली असल्याचे सांगण्यात आले. पूरग्रस्त भागात मदतीसाठी छावण्या, वैद्यकीय पथक, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नेमणूका, पुरेसा औषध साठा, साथरोग सर्वेक्षण, नियंत्रण कक्ष असे प्रयोजन शासनाकडून करण्यात येत आहे.

राज्यात मुसळधार पावसामुळे ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, जळगाव, हिंगोली, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. तर ठाणे, कल्याण, भिवंडी, अकोला या शहरी भागातही काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले. तुलनेत ठाणे २, पालघर ४, ठाणे मनपा २, कल्याण मनपा ८ गावे पूरग्रस्त निकषात मोडत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात २१, सिंधूदूर्ग जिल्ह्यात ३० रायगड जिल्ह्यात ५९ अशी कोकण पट्टयातील गावे पूरग्रस्त म्हणून घेषित करण्यात आली आहेत. मात्र, यात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ९५ गावे पूराखाली असल्याची नोंद करण्यात आली. तर बुलढाणा जिल्ह्यात ६८ गावे पूराखाली आहेत. तसेच अकोला ३९ तर वाशिम जिल्ह्यात २० गावे पूरग्रस्त असल्याची नोंद करण्यात आली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here