Twitter : @maharashtracity

पिंपरी, पुणे

विकसित तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. माणसाचे जगणे त्यामुळे सोपे, सुलभ होत आहे. विज्ञान-तंत्रज्ञान हे समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त आहे. शेती, औद्योगिक, आर्थिक सेवा, सुविधा अशा सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठे बदल होत आहेत. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रोजगार कमी होतील, अशी भीती व्यक्त केली जाते. मात्र ते खरे नाही. विकसित तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या संधींमध्ये बदल झाला आहे. तंत्रकुशल मनुष्यबळाची अधिक गरज भासणार आहे, असे मत जॉन डियर मोलिन कंपनीचे (यूएसए) भारतातील तंत्रज्ञान विभागाचे धोरण प्रमुख नीलकंठ देवशेटवार यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या (पीसीयु) २०२३-२४ शैक्षणिक वर्षाचा प्रथम ‘दीक्षारंभ’ विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ साते, मावळ येथील मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी देवशेटवार यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मध्यप्रदेश सरकारच्या वित्त विभागाचे सचिव ज्ञानेश्वर पाटील, पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी, कुलसचिव डॉ. राजीव भारद्वाज, प्रशासकीय मंडळाचे सदस्य डॉ. पंडित विद्यासागर, प्रबंधक डॉ. डी. एन. सिंग, पीसीईटी चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, डॉ. आर. जी. बिरादार, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिश तिवारी, आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे,  प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे, पीसीसीओईच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत, डॉ. संजीवनी सोनार, डॉ. शितल भंडारी आदी उपस्थित होते.

ज्ञानेश्वर पाटील म्हणाले, ज्ञानाचे वेगवेगळे बिंदू जोडण्याची समज शिक्षणातून मिळते. विद्यार्थ्यांनी चार वर्षांच्या शैक्षणिक काळात जेवढे ज्ञान मिळेल त्याचा एकत्रित संचय करण्याचा प्रयत्न केला तर बौध्दिक विकासाला मदत होईल. अभ्यासाबरोबरच आपले छंदही जोपासले पाहिजेत त्यातून सुदृढ मानसिक आणि शारीरिक आरोग्य लाभेल. 

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनाचा नवीन आरंभ सुरू झाला आहे. उच्च शिक्षीत, कर्तबगार, सुसंस्कृत नागरिक घडविण्याच्या हेतूने पीसीईटी आणि पीसीयु कार्य करत आहे. म्हणूनच आजच्या स्वागत समारंभाला ‘दीक्षारंभ’ संबोधले आहे. विद्यापीठात शिक्षण घेताना स्वतःला सिद्ध करा, संकटाला न घाबरता सामोरे गेलात की यश नक्कीच मिळते. यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट, बायपास नाही असे पाटील यांनी सांगितले.

यावेळी डॉ. मनिमाला पुरी, डॉ. राजीव भारद्वाज, डॉ. पंडित विद्यासागर, डॉ. रोशनी राऊत, डॉ शितलकुमार रवंदळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. आर. जी. बिरादार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सोनिया वर्मा, डॉ. अर्चना धामरे यांनी तर डॉ. डी. एन. सिंग यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here