X : @milindmane70

महाड: महाड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शहरातील गवळ आळीमध्ये दिवसाढवळ्या घराचा दरवाजा फोडून अडीच लाखांच्या दगिन्यांचा ऐवज लंपास करण्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.

महाडमध्ये मोठ्या प्रमाणावर घरफोडीचे सत्र सुरू आहे. शहर पोलिसांना आव्हान देत शहरातील मध्यवर्ती वस्तीतील गवळ आळीमधील वामन स्मृती बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर घरफोडी करण्यात आली. सिद्धेश दत्तात्रय दिघे यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून दुपारी अडीचच्या सुमारास बाजूच्या रहिवाशांच्या घराला कड्या लावून बाहेरून तसेच दरवाज्यावरील इतर रहिवाशांच्या आय होलला बाहेरून स्टिकर लावून दिघे यांच्या घराचा दरवाजातील लॉक तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील सोन्याचे गंथन, हार आणि दोन अंगठ्या असा अंदाजे अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास करून व घरातील सामान अस्ताव्यस्त पसरवून चोर पळून जाण्यात यशस्वी झाले.

याबाबत सिद्धेश दिघे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली असून पोलीस घटनेचा तपास करत आहे. त्याचबरोबर दुसऱ्या घरफोडीच्या मिळालेल्या माहिती नुसार शहरातील काजलपुरा या ठिकाणी अमर पॅलेस या बिल्डिंग मध्ये दुसऱ्या मजल्यावर नंदकुमार जगन्नाथ जाधव यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here