मुंबई

लग्नाच्या सहा वर्षांनंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह आई-बाबा होणार आहेत. या दाम्पत्याने सोशल मीडियावरुन ही आनंदाची बातमी दिली. दीपिकाने डिलिव्हरीचा महिनाही चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

नुकत्यच ब्रिटीश फिल्म अवॉर्ड BAFTA दरम्यान दीपिका प्रेजेंटर म्हणून तेथे उपस्थित होती. येथे ती आपलं पोट लपवत असताना दिसली होती. यावेळी तिच्या जवळच्या व्यक्तीने दीपिका गर्भवती असल्याचं सांगितलं होतं. दोन महिन्यांपूर्वी दीपिका पादुकोणने सिंगापूर वोग मॅगजीनला दिलेल्या एका मुलाखतीत ते लवकरच कुटुंब वाढवण्याचा विचार करीत असल्याचं सांगितलं होतं. यावेळी तिला आई होण्याचा काही विचार आहे का? असं विचारण्यात आलं होतं. यावेळी दीपिका म्हणाली होती, नक्कीच… मला आणि रणवीरला लहान मुलं खूप आवडतात. आम्हीदेखील त्या दिवसाची वाट पाहत आहोत.

https://www.instagram.com/p/C36wUZJovqw/?utm_source=ig_embed&ig_rid=2db9ebc8-5f39-42db-aaf4-ff1b8dd50235

२०१८ मध्ये इटलीत केलं होतं डेस्टिनेशन वेडिंग…
दीपिका पादुकोण हिने २०१८ मध्ये रणवीस सिंह याच्यासह लग्नगाठ बांधली होती. दोघांची पहिली भेट ‘गोलिया की रासलीला : रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. सोबत काम करीत असताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. पाच वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here